राहत्या जागेत अनोळखी महिलांना आणायचा म्हणून मित्राने…

 पश्चिमेकडील एका पडीक इमारती मध्ये एका तरुणाची एका इसमाने दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. थापा अस या मयत इसमाच नाव आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटना स्थळी घेत तपास करत अवघ्या २४ तासात आरोपीला गजाआड केल आहे .शेरबहादुर धामी अस या आरोपीचं नाव असून तो मूळचा नेपाळी आहे. तो दोघांना राहायला घर नसल्याने तो पडीक इमारतीचा आसरा घेतला होता.

थापा असे या मयत तरुणाचे नाव असून तो चायनीज मध्ये कुक होता.ही हत्या थापा च्या  मित्राने केल्याचे तपासात निष्पन्न  झाले पोलिसांनी २४ तासात आरोपी शेरबहादुर धामी या आरोपीला अटक केली.  धामी हा मूळचा नेपाळचा आहे तो कल्याण मध्ये बिगारचे काम करतो. धामी आणि मयत थापा हे दोघे मित्र होते त्यांना राहण्यासाठी घर नसल्याने त्यांनी या पडीक इमारतीचा आसरा घेतला होता.

थापा हा कायम या ठिकाणी महिलांना घेवून येत होता. येथे महिलांना आणू नको असे सांगत धामी ने विरोध केला. मात्र थापा ऐकत नव्हता.  त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला याचा वादातून धामी याने थापा याच्या डोक्यात दगड घातला होता. या हल्ल्यात थापा गंभीर जखमी झाला, धामी तेथून निघून गेला त्यानंतर सकाळी धामी परत आला तेव्हा तो जिवंत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने पुन्हा त्याच्या डोक्यात दगड घालत त्याची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *