आपल्या कलेच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नेहा कक्करडे पाहिलं, की लक्षात येतं पाहता पाहता तिच्या प्रसिद्धीचा व्यास चांगलाच मोठा होत आहे. प्रचंड मेहनत करत नेहा आज या टप्प्यावर पोहोचली. पण, तिचा आतापर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता.
घरोघरी किंवा विविध भागांमध्ये जात नेहा तिच्या बहिणीसोबत म्हणजे सोनू कक्कर हिच्यासोबत जगरात्यांमध्ये गात होती. पैसे कमवण्यासाठी या बहिणींच्या जोडीनं या मार्गाचा बरीच वर्षे वापर केला.
नेहाच्या नशीबाला तेव्हाच कलाटणी मिळाली, जेव्हा ती एका सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली. नेहा इथं यशस्वी नाही ठरली, पण तिला यशाच्या अनेक वाटा मात्र दिसल्या.
पाहता पाहता नेहानं योग्य गोष्टींची निवड करत आपली वाट चालण्यास सुरुवात केली. आजच्या घडीला ती एका गाण्यासाठी तब्बल कोट्यवधी रुपयांचं मानधनही घेते.
हल्लीच्या दिवसांमध्ये बहुतांश चित्रपटांमध्ये नेहाची गाणी असतात. रिअॅलिटी शोम्ये परीक्षक म्हणूनही ती सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नेहाची वार्षिक कमाई तब्बल 33 कोटी रुपये इतकी आहे.
