दरोड्याचा बनाव; लहान मुलांना बांधून पतीने पत्नीचा कायमचा काढला काटा

धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरोड्याचा बनाव करत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील रंजेगाव इथे महिलेला विवस्र करुन खून करण्यात आला. यासाठी पती आणि त्यांच्या लहान मुलांना बांधून उघड झाले. या घटनेनंतर  जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. दरम्यान, या घटनेचा छडा बीड पोलिसांनी अवघ्या काही तासातच लावला. त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली.

पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी पतीने मोठा बनाव रचला होता. हा बनाव पोलीस तपासात उघड झाला. दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचा बनाव पीडित महिलेच्या पतीने रचला होता. मात्र सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच पतीने हे कृत्य केल्याची कबुली दिली.

हत्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आरोपीने पत्नीची हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. नवऱ्याने आपल्या बायकोचा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हत्या केल्याचे पोलिसा तपासात उघड झाले. आधी पतीने पत्नीचा गळा दाबल्याचे चौकशीत समोर आले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *