मायलेकींची रेल्वेखाली देवळालीत आत्महत्या

बार्न स्कूल येथील अनिता शिरोळे (वय ४३) व राखी शिरोळे (२३) या मायलेकींनी रविवारी (दि. २९) सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली. कारण समजू शकले नाही.

बार्नस्कूल येथे साऊथ रोड पाळदे मळा येथून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर आई व मुलीने सकाळी अकरा वाजेपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिरोळे कुंटबीयांची स्कूटी रेल्वेरूळापासून काही अंतरावर आढळून आली. त्यानंतर मृतांची ओळख पटली. मयत अनिता शिरोळे यांचे पती बाळासाहेब शिरोळे रेल्वेचे ठेकेदार असून, व्यवसायापोटी सध्या सोलापूर येथे असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *