केंद्रीय मंत्री नारायण राणे रूग्णालयात दाखल

भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयाचा त्रास उद्भवू लागल्याने रूग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांना दाखल केल्याची माहिती मिळतेय.

छातीत दुखत असल्याने नारायण राणेंना रूग्णालयात दाखल केलं गेलं. डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर काही दिवस त्यांना रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *