कोलंबियाच्या न्यायालयाने बुधवारी एक मोठा निर्णय दिला. या निर्णयाअंतर्गत कोलंबियाने गंभीर वैद्यकीय प्रकरणांमध्ये आत्महत्येचं समर्थन केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आत्महत्येसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे. तिथल्या वकिलांनी सांगितलं की, कोलंबिया आता हा नियम लागू करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश बनला आहे.
इच्छा मृत्यु 1997 पासून वैध
कोलंबियामध्ये 1997 सालपासून इच्छा मृत्यु कायदेशीररित्या वैध आहे. असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने या वर्षी जानेवारीमध्ये पहिल्यांदा याचा वापर केला होता.
जेव्हा एखादी व्यक्ती डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर जीवन संपवण्याचं पाऊल उचलते तेव्हा त्याला सहाय्यक आत्महत्या म्हणून वर्गीकृत केलं जाईल. कोलंबियन राईट-टू-डाय ग्रुप DescLAB ने खटला दाखल केल्यानंतर या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
