राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *