तक्रारदार महिलेवर बलात्कारप्रकरणी पोलीस शिपायास अटक

पतीविरोधात घरगुती हिसाचाराची तक्रार देण्याकरिता नवघर पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेला मदतीच्या बहाण्याने अन्यत्र नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक करण्यात आली आहे.  बाबासाहेब ढोले असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पीडितेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या २७ वर्षीय महिलेस आरोपीने  मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याने तिला उत्तन येथील धारावी मंदिरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला घरच्यांशी ओळख करून देतो असे सांगून राहत्या घरी नेले आणि  बळजबरी केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *