श्रीलंकेत परिस्थिती बिकट, देश सोडून भारतात येऊ लागले लोकं

श्रीलंकेत परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाई देखील वाढली आहे. इतर जीवनावश्यक वस्तू देखील मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत. अनियंत्रित महागाई आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील लोकं आता देश सोडून जात आहेत. श्रीलंकेतील लोक आपला देश सोडून भारतात येत आहेत. मंगळवारी 16 श्रीलंकन तमिळ नागरिकांनी (Tamil families) आपला देश सोडला आणि भरपूर पैसे देऊन बोटीने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचले. या लोकांमध्ये चार महिन्यांच्या नवजात बालकाचाही समावेश आहे.

श्रीलंकेतील जाफना आणि तलाईमन्नार येथून दोन गटात हे लोक तामिळनाडूत पोहोचले. पहिल्या गटात तीन मुलांसह सहा जणांचा समावेश होता. श्रीलंकेतील या लोकांमध्ये चार महिन्यांचा मुलगा असलेल्या जोडप्याचा समावेश आहे. हे सर्व लोक फायबर बोटीतून किनारपट्टीवर पोहोचले जेथे तटरक्षक दलाने त्यांची सुटका केली. दुसऱ्या गटात पाच मुले आणि तीन महिलांसह १० जणांचा समावेश होता.

6 जणांच्या गटाने भारतातील अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारीही शिगेला पोहोचली आहे, म्हणून त्यांनी आपला देश सोडला.

 प्राथमिक चौकशीत ते जाफना आणि तलाईमन्नार येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व सहा श्रीलंकन (Sri Lankan) तामिळ नागरिक रात्री दहाच्या सुमारास श्रीलंकेतून एका बोटीत बसले. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली. ज्या खलाशीने त्यांना आणले होते त्याने लोकांना एका छोट्या बेटावर सोडले आणि खोटे बोलले की रामेश्वरमहून कोणीतरी त्यांना घेण्यासाठी येईल.

प्रत्येक व्यक्तीने भारतात येण्यासाठी 10 हजार दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *