राजस्थानमध्ये लाऊडस्पीवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद

महाराष्ट्रातून सुरु लाऊडस्पीकरचा वाद राजस्थानच्या जोधपूरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. ईदच्या पूर्वसंध्येला राजस्थानच्या जोधपूरमधील जालोरी गेटवर ध्वज आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिस उपायुक्त, एसएचओ यांच्यासह अनेक जण जखमी झाले. अर्ध्या तासाच्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. दुसरीकडे जोधपूरमध्ये अनिश्चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जोधपूर शहरात रात्री उशिरा लाऊडस्पीकर आणि झेंडे हटवण्यावरून वाद झाला होता. शहरातील जालोरी गेट चौकातील लाऊडस्पीकर व धार्मिक ध्वज हटविण्यावरून रात्री ११.३० वाजता दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. दरम्यान, या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जालोरी गेट चौकाच्या दोन्ही टोकापासून दगडफेक सुरू झाली. त्यानंतर जोधपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *