सध्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आलं आहे. सांगलीमधील शिराळा कोर्टाने हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
६ एप्रिलला हे वॉरंट काढण्यात आलं आहे. एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिराळा कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, “सुप्रीम कोर्टाने पाच ते दहा वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट पाठवलं आहे”.
