कोरोनानंतर आणखी एका नव्या आजाराची भर पडली आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनच्या पहिला मानवी रुग्ण सापडला आहे. चार वर्षांच्या मुलाला H3N8 Bird Fluचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, आरोग्य अधिकारी स्पष्ट केले की, लोकांमध्ये हा संसर्ग पसरण्याचा धोका अजूनही कमी आहे.
2002 मध्ये पहिली घटना
H3N8चा पहिल्यांदा 2002 मध्ये उत्तर अमेरिकेत विषाणू आढळून आला होता. यानंतर घोडे, कुत्रे आणि सील यांना संसर्ग झाला, परंतु या संसर्गाचा प्रभाव मानवांमध्ये दिसला नाही.
ताप आल्यावर मुलाची चाचणी
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, मध्य हेनान प्रांतात राहणाऱ्या एका 4 वर्षांच्या मुलामध्ये ताप आणि इतर लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या मुलाच्या या महिन्याच्या सुरुवातीला चाचण्या केल्या. ज्यामध्ये हा मुलगा H3N8 Bird Flu या विषाणूने पॉझिटिव्ह आढळला होता. नॅशनल हेल्थ आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मुलाच्या कुटुंबाने घरी कोंबडी पाळली होती आणि हे कुटुंब जंगली बदकांचे वास्तव्य असणाऱ्या भागात राहत होते.
