कोट्यवधीचा मालक, तरीही गॅस अनुदान हवं,फारूख अब्दुल्लांचा सबसिडीसाठी अर्ज

कोट्यवधीचा मालक, तरीही गॅस अनुदान हवं,फारूख अब्दुल्लांचा सबसिडीसाठी अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर 25 लाख देशवासियांनी गॅस सबसिडी नाकारली आहे. मात्र जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला गॅस सबसिडी सोडायला तयार नाहीत.

14 ऑगस्टला त्यांनी गॅस सबसिडीसाठी फॉर्म भरला आहे. तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या फारुक अब्दुल्ला यांची 13 कोटींची संपत्ती आहे. त्यांचं मासिक उत्पन्न 89 हजारांच्या घरात आहे. पण तरीही 208 रूपयांसाठी फारूक अब्दुल्लांनी गॅस सब्सिडीचा फॉर्म भरला आहे.

दरम्यान, अब्दुल्लांच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप आणि पीडीपीने टीकास्त्र सोडलं आहे.

माजी मुख्यमंत्री अब्दुल्लांकडे काय कमी आहे? इतकी संपत्ती असूनही त्यांना अनुदान हवं आहे. जर अब्दुल्ला इतकेच गरीब असतील तर त्यांना आम्ही 6 वर्षांसाठी फुकटात गॅस सिलेंडर देण्यास तयार आहोत, असं पीडीपीचे प्रवक्ते वहीद उर रहमान यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजप आमदार रविंद्र रैना यांनीही अब्दुल्लांवर तोफ डागली आहे. अब्दुल्ला स्वत:च्या उपचारासाठी अमेरिकेत जातात, मात्र त्यांना गॅसचं अनुदान सोडावं वाटत नाही, असं रैना यांनी म्हटलं आहे.

गरजूपर्यंत सेवा पुरवता यावी, यासाठी देशातील सधन नागरिकांनी गॅस सबसिडी घेऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *