कांदा चोरी प्रकरणी एकाला अटक

कांदा चोरी प्रकरणी एकाला अटक

देशभरात कांद्यांचे भाव वाढल्यानंतर कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र कांदा चोरणारे चोर जेरबंद झाल्याची माहिती आतापर्यंत आली नव्हती, राजस्थानात पहिला कांदा चोर सापडल्याची बातमी आली आहे.

कांद्याच्या गोदामातून ७० गोणी कांदा चोरण्यास मदत करण्याचा आरोपावरून, ५५ वर्षाच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी त्याच्याकडून ही कांद्याची सर्व पोती जप्त केली आहेत. याप्रकरणात मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *