पुणे शहरातील बाणेर भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे, पुण्यातील अलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने धाड टाकून स्पाच्या नावाखाली सुरु असलेला हा वेश्या व्यवसाय बंद केला आहे. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
बाणेर येथे हा डिव्हाईन स्पा सुरु होता, या स्पावर कारवाई करण्यात आली आहे. स्पाचा मालक दीपक कृष्णा पाटील तसेच एक मॅनेजर सचिन प्रकाश शिंदे आणि पंचमाया लेपचा यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण दुरगुडे याच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणेरमध्ये अलिशान सोसायटीत पहिल्या मजल्यावर डिव्हाईन स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता, अनेक रहिवाशांना याची कल्पना देखील नव्हती, पण काहींना संशय आल्यानंतर ही कारवाई झाली असावी असं म्हटलं जात आहे.
