दुष्काळ दौऱ्यात भर पावसात मुख्यमंत्र्यांची सभा

दुष्काळ दौऱ्यात भर पावसात मुख्यमंत्र्यांची सभा

दुष्काळ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पाऊस आल्यानं उपस्थित नागरिक चांगलेच सुखावले. बुधवारी उस्मानाबादचा दौरा आटोपून मुख्यमंत्री दुष्काळी बीड जिल्ह्यात दाखल झाले त्यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

विशेष म्हणजे भर पावसातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. शिवाय दुष्काळग्रस्त जनतेनंही मुख्यमंत्र्यांचं हे अवघं भाषण पावसात उभं राहुनच ऐकलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा शुभशकुन असल्याचं मत व्यक्त करत वरुणराजाची अशीच कृपा कायम राहावी अशी प्रार्थना केली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मागे असलेल्या मंचावरचे नेतेही भर पावसामध्ये बसून राहिले. गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये पाहाणी दौरा करत आहेत. पण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसानं किमान बीडमधली जनता सुखावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *