मुंबईत शिवसेना आक्रमक, तर दिल्लीत संजय राऊतांची घरी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं राहतं घर ईडीने जप्त केलं आहे, यानंतर मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.तर दिल्लीत संजय राऊत यांच्या घरी काही शिवसेना खासदार  आणि महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेत आहेत. मुंबईत शिवसैनिकांनी ईडीचा पुतळा जाळत या कारवाईचा निषेध केला आहे. संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर शिवसैनिकांनी शिवसेनेच्या भांडूप कार्यालयाच्या शाखेसमोर जमून जोरदार घोषणाबाजी केली आहे.

सकाळी संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच

ईडीने आज सकाळी संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील काही प्लॉट आणि घर सील करुन संपत्तीवर टाच आणली आहे. ही संपत्ती एकूण ११ कोटी रुपयांची असल्याचं सांगितलं जात आहे.

तर ही कारवाई झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर बंदूक लावा, तरी घाबरणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. ११ कोटी ही बेहिशेबी मालमत्ता नाही, किंवा यात एक रुपयाही भ्रष्टाचाराचा नाही, यात १ रुपयाही भ्रष्टाचाराचा सापडला तर माझ्या नावे जेवढी संपत्ती आहे, तेवढी मी भाजपाला दान करेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *