मुंबईत गटार खोदताना दुमजली घरच कोसळले, 4 जण गंभीर जखमी

गटाराचे काम सुरु असताना याचा धोका घराला पोहोचला. कांदिवली पश्चिम इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवासंघ चाळीजवळ एक दुमजली घर कोसळले. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झालेत. यात दोन महिलांचा आणि दोन मुलांचा समावेश आहे.

जेसीबीच्या सहाय्याने गटार बनवण्याचे काम सुरू होते. गटाराचे खोदकाम करताना याचा धोका घराला पोहोचला आणि काम सुरु असताना हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील 4 जणांना वाचवण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिला आणि दोन मुले गंभीर आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून बचाव कार्य सुरु केले आहे. मातीचा ढिगारा बाजुला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *