सावध करणारी बातमी, बोगस डॉक्टरचा गोरखधंदा

तुम्हाला सावध करणारी बातमी. मुंबईतील दिंडोशीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. बारावी नापास व्यक्ती डॉक्टर म्हणून उपचार करत होता. बनावट सर्टिफिकेटच्या आधारे गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.

दिंडोशी परिसरात बारावी नापास व्यक्ती बोगस डॉक्टर म्हणून काम करत असल्याचं उघड झाले आहे. सुकेश गुप्ता असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. गेल्या चार वर्षांपासून बनावट सर्टिफिकेटच्या आधारे हा गोरखधंदा सुरू होता.

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचला आणि या बोगस डॉक्टरला अटक केली. पोलिसांनी दवाखान्यातील साहित्य, औषधं जप्त केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *