कोव्होवॅक्स लशीला मंजुरी

सीरम इन्स्टिटय़ूटच्या १२ ते १७ वर्षे वयोगटासाठीच्या कोव्होवॅक्स लशीचा आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. करोनाविषयक तज्ज्ञ समितीने गेल्या आठवडय़ात या वयोगटासाठी कोव्होवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरीची शिफारस केली होती़  त्यानुसार केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून ही मंजुरी मिळाली आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी सशर्त दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. १२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार ७०७ मुलांवरील दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े  १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली कोव्होवॅक्स ही चौथी लस आह़े

 १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सरसकट लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि लसीकरणासाठी लोकसंख्येच्या समावेशाची व्याप्ती किती वाढवायची, याबाबत सतत तपासणी केली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *