गुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी आंदोलन करणारा हार्दिक पटेल आता ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ करणार आहे. हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वात दांडी ते साबरमती आश्रमपर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. पटेल आरक्षण आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असल्याचं म्हटलं जातं.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींनी 1930 मध्ये काढलेल्या दांडी यात्रेचं विशेष महत्त्व आहे. गांधीजींनी मीठासाठी साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पदयात्रा काढून सत्याग्रह केला होता. आता हार्दिक पटेलने गांधींजींचा मार्ग अवलंबत ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे.
‘पाटीदार अनामत कूच’ अशी 350 किमीची पदयात्रा काढणार असल्याचं ‘पाटीदार अनामक आंदोलन समिती’चे सदस्य दिनेश पटेल यांनी सांगितलं. सहा डिसेंबरपासून निघणाऱ्या दहा दिवसांच्या या पदयात्रेदरम्यान हार्दिक काही नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत.
