शाहरूख खान प्रशंसकांसोबत लवकरच आपली आत्मकथा करणार शेअर

शाहरूख खान प्रशंसकांसोबत लवकरच आपली आत्मकथा करणार शेअर

रोमान्स किंग शाहरूख खान प्रशंसकांसोबत आपली आत्मकथा शेअर करणार आहे, शाहरूख अनेक दिवसांपासून ही कथा लिहित आहे.

४९ वर्षाचा शाहरूख आपल्या फिल्म रिलीजमध्ये सध्या व्यस्त आहे, त्याने आपल्या अपूर्ण कामाच्या यादीला सदाबहार नाव दिलं आहे, शाहरूखने ट्ववीट केलं आहे, शाहरूख म्हणतो ही यादी मी माझ्यासमोर ठेवली आहे, ती नेहमीच वाढतेय आणि बदलतेय’.

शाहरूखच्या या लिस्टमध्ये गिटार, स्वयंपाक बनवणं शिकणं, पाच कॉकटेल बनवणं, एक छान जीन्स शोधणं, पुस्तक लिहणं अशी अनेक कामे आहेत. आपल्या पुस्तकाविषयी त्याने मजेत लिहलं आहे, कुणीतरी थांबवा मला, आत्मकथा ‘२० इयर्स इन ए डिकेड’मध्ये शाहरूखने आपले स्टारडमशी संबंधित अनुभव शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *