उत्तरप्रदेशात जन्मली ‘माँ काली’… गावकऱ्यांवर कोपली

 उत्तरप्रदेशात जन्मली ‘माँ काली’… गावकऱ्यांवर कोपली

उत्तरप्रदेशातल्या कानपूरमध्ये एक अजब बाळ जन्माला आलं. काळाकुट्ट चेहरा असलेल्या या बाळाचं शरीर मात्र साधारण रंगाचं आहे.

धक्कादायक म्हणजे, या बाळाला ‘काली माँ’ म्हणत अनेक अंधश्रद्धाळूंनी हात जोडत आणि पायाला हात लावत या बाळाचं सोमवारी दर्शनही घेतलंय.

कानपूरमध्ये बलरामपूर या गावात ही मुलगी जन्माला आली होती. पण, जन्मानंतर केवळ अर्ध्यातासांतच तिचा मृत्यू झाला. पण, अंधश्रद्धाळू गावकऱ्यांनी मात्र याचा अर्थ ‘आपल्यावर देवी कोपलीय’ असा घेतला… आणि त्यासाठीच ‘काली माँ’ संबोधत या मृत लहान बाळाचे पाय धरले.

या मृत बाळाच्या दर्शनासाठी त्यामुळेच एकच गर्दी जमली… अनेकांनी या मृत बाळाच्या चरणी पैसेही टाकले… ती रक्कम जवळपास १० हजारांच्या घरात गेली. या गर्दीमुळे त्या दिवशी या बाळाचे अंत्यविधीही शक्य झाले नाही. या बाळाच्या आईच्या – कृष्णाच्या घरात आजही भजन-किर्तन सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *