अभिनेत्री राणी मुखर्जीच्या घरी येणार लवकरच नवा पाहुणा

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या घरी येणार लवकरच नवा पाहुणा

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यातीलच नवी बातमी म्हणजे राणी मुखर्जी जानेवारीमध्ये बाळाला जन्म देईल.

इंग्रजी वृत्तपत्र ‘मुंबई मिरर’च्या बातमीनुसार राणी मुखर्जी प्रेग्नेंट आहे आणि जानेवारी 2016मध्ये ती आई होईल. राणी मुखर्जीनं 21 एप्रिल 2014ला आदित्य चोप्रासोबत लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वी राणीची वहिनी आणि टिव्ही अभिनेत्री ज्योती मुखर्जीनं सांगितलं होतं की, हो राणी प्रेग्नेंट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राणी मुखर्जी आपला पती आदित्यसोबत यूकेमध्ये एक महिन्यांहून अधिक काळ सुट्टी साजरी करून मुंबईत परतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *