महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात ही भूमिका कोणतीही राजकीय भूमिका नसून वैयक्तिक आयुष्यामध्ये राज ठाकरेंचं आजोबा म्हणून प्रमोशन होमार आहे. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरेंकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. नुकतीच अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता ही खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी समोर आलीय.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सध्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु असल्याचे समजते. राज आणि त्यांच्या पत्नी म्हणून आजी होणाऱ्या शर्मिला ठाकरे हे या बातमीमुळे फार आनंदात असून एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील पाहुण्याचे आमगन होणार असल्याची माहिती समोर आलीय.
