शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी दोन विद्यार्थिनींसह चौघांनी जीवन संपविल्याच्या घटना समोर आल्या. चारही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पहिली घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगलदीप सोसायटीत घडली. जाफरीन (१९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती डी. फार्मचे शिक्षण घेत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, जाफरीनचे वडील बंगळुरू येथील कंपनीत काम करतात, तर मोठा भाऊ खासगी नोकरी करतो. जाफरीनच्या आधारकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यातील जन्मतारखेत तफावत होती. तसेच जन्मप्रमाणपत्रही गहाळ झाले होते. त्यामुळे महाविद्यालयातील शिष्यवृत्ती अर्ज भरणे आणि बँक खाते उघडणे यासाठी तिला अडचणी येत होत्या. या कारणामुळे ती काही दिवसांपासून तणावात होती, अशी माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली. रविवारी सकाळी तिने आयुष्य संपविले.