पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. या अभिनेत्रीकडून लॉजवर हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मिळालेली माहिती खरी आहे की खोटी हे पडताळून पाहिलं. वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खरी होती.
पोलिसांनी त्यानुसार प्लॅन केला. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या ताथवडेमधील साई लॉजवर बनावट ग्राहकाला पाठवला.
बनावट ग्राहकाने पोलिसांनी दिलेल्या सूचनेचं तंतोतंत पालण केलं. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर धाड टाकली अन् अखेर या सेक्स रॅकेटचा प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणातला आरोपी हा व्हॉट्सअप कॉल करायचा. त्यानुसार लॉजवर मुली पाठवायचा. संबंधीत मुलगी लॉजवर आपल्या नावाने रुम बुक करायची. असा हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरु होता. मात्र पोलिसांनी हा डाव हाणून पाडला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध पोलिसांनी वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या वेश्या व्यवसायाच्या गटार गंगेतून अभिनेत्रीसह तिघींची सुटका करण्यात आली. ही अभिनेत्री छत्तीसगढमधील असल्याची माहिती मिळत आहे.
