कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद

कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद

मोदी सरकारकडून कामगारासंदर्भात लागू केल्या जाणाऱ्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये बँका, विमा, खासगी उद्योग आणि सेवा क्षेत्रातले कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कामगारांशी  संबंधीत या सुधारणांना विविध क्षेत्रातल्या 11 संघटनांनी विरोध केला आहे. राज्यातल्याही अनेक कामगार संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

 

भारतीय मजदूर संघाची बंदमधून माघार

 

भारतीय मजदूर संघानं या बंदमधून ऐनवेळी माघार घेतलेली असली तरी त्याचा आंदोलनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा दावा प्रमुख सहभागी संघटनांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *