रस्त्यावर सापडलेल्या 20 डॉलरमुळे ‘तो’ करोडपती बनला

रस्त्यावर सापडलेल्या 20 डॉलरमुळे ‘तो’ करोडपती बनला

जर तुम्ही एखाद्या रस्त्यावरुन चालत असता आणि अचानक तुम्हाला पैशांच्या नोटा सापडतात..त्या नोटांची तुम्ही लॉटरीची तिकीट खरेदी करता… आणि चक्क लॉटरी जिंकून करोडपती बनता.. सारं कसं काल्पनिक वगैरे वाटतं ना? मात्र, सॅन फ्रॅन्सिस्कोमधील एका व्यक्तीसोबत प्रत्यक्षात हे घडलं आहे.

सॅन फ्रॅन्सिकोमध्ये ह्युबर्ट टँग यांचं नशीब पलटलं आहे. ह्युबर्ट यांना 20 डॉलरची एक नोट सॅन फ्रॅन्सिस्को इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाहेर मिळाली. ह्युबर्ट यांनी लॉटरीच्या दुकानातून लॉटरीची दोन तिकिटं खरेदी केली. ह्युबर्टचं नशीब असं की, तो लॉटरी जिंकला आणि तीही तब्बल साडेसहा कोटी रुपयांची.

ह्युबर्ट टँग हा सॅन फ्रॅन्सिस्को एअरपोर्टवर बारटेंडरचं काम करतो. लॉटरीचा विजेता ठरल्याने ह्युबर्टलाही प्रचंड आनंद झाला.

त्याला जेव्हा लॉटरीतून मिळालेल्या पैशांचं काय करणार असं विचारलं, तेव्हा ह्युबर्टने अतिशय मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, “सॅन फ्रॅन्सिस्कोतील रस्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी 20 डॉलरच्या नोटा ठेवेन. जेणेकरुन इतर भाग्यवान लोकांनाही ते मिळतील आणि ते तेही करोडपती बनतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *