जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता मसरत आलम याला आज (मंगळवार) पुन्हा अटक करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञातस्थळी नेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतविरोधी घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्या मसरत आलम या फुटीरवादी नेत्याला उच्च न्यायालयाने दिलासा देत त्याला ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा आदेश रद्दबातल ठरविला होता. त्यामुळे त्याची 21 ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली होती. परंतु, आज पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे.
आलमने 17 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. “हुर्रियत कॉन्फरन्स‘चे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये आलमने भारताविरोधात गरळ ओकली होती.

