पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात सहा ठार

पाकिस्तानमधील वायव्य भागात असलेल्या आदिवासी भागात एकाने घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात चार पोलिसांसह सहा ठार तर 31 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिस अधिकारी शहाब अली शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अफगणिस्तान सीमेवर असलेल्या जाम्रुड गावामध्ये हा स्फोट झाला. आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. यावेळी चार पोलिसांसह सहा जण ठार झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.‘

आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. परंतु, तालिबान अथवा इस्लामिक ग्रुपने हा हल्ला घडवून आणण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *