आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत दिले मोठे संकेत

फेब्रुवारीअखेर सिनेमा-नाट्यगृहांसह हॉटेल, बार 100 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.

आरोग्य मंत्र्यांच्या संकेतानुसार फेब्रुवारीअखेर नाट्यगृह, चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्यानं नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याकडे कल राहिल, अशी माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *