टीईटी घोटाळा: आरोपी गणेशन स्वतःहून पुणे पोलिसांसमोर, पण…

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (TET Scam) प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन मंगळवारी पुणे पोलिसांपुढे स्वत:हून हजर झाला. गणेशन याला बेंगळूरू न्यायालयानं २५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळं तूर्त त्याची अटक टळली आहे.

टीईटी घोटाळा प्रकरणात याआधी जी. ए. सॉफ्टवेअरच्या प्रितीश देशमुख व अश्विनकुमार याला अटक झाली आहे. अश्विन कुमार याच्याकडून १ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता आणि याच तपासात सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन सुद्धा सामील असल्याचे समोर आले आहे

गणेशन याला तपासासाठी हजर राहण्यासाठी मेलद्वारे नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यास गणेशन यानं काहीही उत्तर दिलं नव्हतं. मधल्या काळात आरोपी व अधिकारी वर्गातील अनेकांना करोना संसर्ग झाल्यामुळे तपासाचं काम मंदावलं होतं. मात्र, आता पुणे पोलीस व सायबर विभागातर्फे तपासकामाला वेग मिळाला आहे. गणेशन हा स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाला आहे. त्यामुळं आता या प्रकरणात बरीच माहिती पुढं येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *