गिझरमधील गॅस गळतीमुळं गुदमरून महिला वैमानिकाचा मृत्यू

बाथरूममध्ये असलेल्या गॅस गिझरमध्ये गळती झाल्याने नाशिकमधील एका महिला वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. रश्मी पराग गायधनी असे मृत महिला वैमानिकाचे नाव आहे. त्या मुंबईच्या रहिवाशी असून त्यांचे माहेर नाशिकचे असल्याने त्या येथे आल्या होत्या.

रश्मी या बाथरूममध्ये गेल्या असता त्या ठिकाणी गॅस गळती झालेली होती. सर्वत्र गॅस पसरला होता. या गॅसमुळं गुदमरून त्या बाथरूममध्येच बेशुद्ध पडल्या. बराच वेळ त्या बाहेर न आल्याने त्यांच्या घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा रश्मी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गायधनी या मुंबईत वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. ज्येष्ठ लेखिका सुमन मुठे तर सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती मुठे यांच्या त्या कन्या होत्या. या घटनेने गायधनी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *