दुचाकी-कारची अपघातात ; तीन ठार, कारचालक जखमी

तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांच्या चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक लागल्याने झालेल्या  अपघातात दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू झाला. ही घटना तिरोडा तालुक्यातील वडेगाव सर्रा गावाजवळ रविवारी दुपारी घडली. या घटनेत कारचालक तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे सुद्धा जखमी झालेले आहेत. त्यांना गोंदियातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोडेबर्रा येथील तीन युवक दुचाकीने सर्राकडून तिरोडाकडे जात असताना तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांच्या कारने दुपारी सर्रा व वडेगाव दरम्यान साकोली रोडवर मुलाची लग्नाची तारीख ठरवून गावी वापस येत असताना दुचाकीला धडक लागली. यात हीरदेसिंग आसाराम टेकाम (७०, रा. मंगेझरी), संपत ठुररी आहाके (६५, रा. कोडेबर्रा), प्रताप संपत आहाके (३४, रा. कोडंबर्रा), असे या घटनेतील मृतांचे नाव आहे. या प्रकरणी कारचालक तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तिरोडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *