नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार, सुनावणी होणार नाही

संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार असल्याच दिसत आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. पण त्यांचा मुक्काम वाढणार अस दिसत आहे.

आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत  सुनावणी होणार होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. पण, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा आहे. यामुळे आज न्यायालय बंद असल्यामुळे सुनावणी होणार नाही.

नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आज सुट्टी असल्याने त्यांचा मुक्काम पुन्हा वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *