अभिनेते रमेश देव यांचं निधन

राठी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. अवघ्या चार दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश देव यांच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची बातमी देव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *