पुण्यातील धक्कादायक प्रकार! कार भाड्याने घेतली, अर्धे पैसेही दिले आणि नंतर…

पुण्यातून भाडे तत्वावर घेतलेली चारचाकी पळवून नेल्याप्रकरणी गोव्यातून हमीद बावर ऊर्फ छेदी खान (वय ४०, रा. कोडलीम, अंगडी, गोवा), अविनाशकुमार प्रेमचंद यादव (वय ३२, रा. कोलया गोवा) या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मच्छिंद्र विश्वनाथ दराडे (लोकमान्य कॉलनी, कोथरुड पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मछिंद्र हे पुण्यात कोथरूड येथे चारचाकी वाहन भाडेतत्वावर सेल्फ ड्राइव्हचा व्यवसाय करतात. १४ जानेवारी रोजी दोघांनी दराडे यांच्याकडून ७ सीटर कार भाडेतत्वावर बुक करून घेतली. एक दिवसाची रक्कम १२ हजार रुपये इतकी ठरली आणि ७ हजार देऊन त्यांनी कार नेली. कार ठरलेल्या वेळेत न आल्याने नेणाऱ्या व्यक्तींना फोन केला असता त्यांचा फोन बंद आला.

 दराडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. दोघांचा मोबाइल क्रमांक ट्रॅक केला असता गोव्यात लोकेशन आढळून आले. त्यानुसार गोव्यात जाऊन पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीतून दोघांनी चारचाकी पळवून नेली असल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *