नववीच्या 2 मुलींची अशा कारणाने आत्महत्या की शिक्षणक्षेत्र हादरलं

पश्चिम महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवणारी घटना आहे. सातारा जिल्ह्यात 2 अल्पवयीन मुलींनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबासह परिसरात सर्वांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांवर दु: खाचा डोंगर पसरला आहे.
पहिली घटना साताऱ्यातील शाहुपुरी इथे घडली आहे. अल्पवयीन मुलीनं चिठ्ठी लिहून आपलं आयुष्य संपवलं आहे. सेमी इंग्लिश अभ्यासक्रम नको असल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. सेमी इंग्लिश मीडियम नको म्हणून मुलीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. ही घटना जेव्हा घडली तेव्हा मुलगी घरात एकटीच होती अशी माहिती मिळाली आहे.
दुसरी घटना शहरातील मलकापूरमध्ये घडली आहे. ही मुलगी 9 वीमध्ये शिकत होती. तिने गळफास घेऊन आपलं आयुष्याचा शेवट केला. या अल्पवयीन मुलीनं आपलं आयुष्य का संपवलं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *