शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

मुंबईतील धारावी येथे सुरु असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. इथं शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमले असता तिथं लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर झालेल्या या घटनेचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेचा संदर्भ देत राज्यात हिटलरशाही सुरु असल्याचा हल्लाबोल दरेकर यांनी केला.

परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं असता शिक्षणमंत्र्याच्या घराबाहेर जमलेल्या या विद्यार्थांवर लाठीचार्ज करण्यात आला.

विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला सरकारकडून मिळणारी ही वागणूक पाहता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *