आतापर्यंत तुम्ही लहान मुलांसाठी आश्रम, अनाथांसाठी आश्रम किंवा वृद्धाश्रम किंवा पीडित महिलांसाठी आश्रम असं ऐकलं असेल. पण आता एक वेगळ्या प्रकारच्या आश्रमाची सध्या जगभरात चर्चा आहे. विवाहित पुरुषांसाठी हे आश्रम सुरू करण्यात आलं आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांसाठी हे खास आश्रम उभारण्यात आलं आहे. या आश्रमाची सध्या सोशल मीडियासह देशात चर्चा सुरू आहे.
ऐकायला विचित्र वाटत असलं तरी खरोखर हे आश्रम महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सुरू करण्यात आलं आहे. या आश्रमात दिवसागणिक येणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रील औरंगाबाद जिल्ह्यापासून 12 किलोमीटर दूर शिर्डी मुंबई महामार्गावर हा आश्रम उभारण्यात आला आहे. हे आश्रम केवळ अशाच लोकांसाठी आहे जे आपल्या पत्नीच्या जाचाला किंवा त्रासाला खूप कंटाळले आहेत. आश्रमातून सल्ला घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 500 लोकांनी येथे सल्ला घेतला आहे. हायवेवरून पाहिल्यावर ती लहान खोलीसारखी दिसते, पण आत गेल्यावर ती आश्रमासारखी दिसते. खोलीच्या एक ऑफिस तयार करण्यात आलं आहे. बायकोमुळे त्रासलेल्या लोकांना इथे सल्ला दिला जातो.
रोज सकाळी आणि संध्याकाळी उदबत्ती लावून इथे पूजा केली जाते. दर शनिवारी, रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत पत्नी-पीडितांचे समुपदेशन केलं जाते. या आश्रमात छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून अनेक लोक सल्ला घेण्यासाठी येत आहेत.
