मुंबई – ताडदेव परिसरातील इमारतीला आग; 2 जणं जखमी

मुंबईत शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडलीये. ताडदेव परिसरातील कमला इमारतीला ही आग लागल्याची माहिती आहे. 20 मजल्याची ही इमारत असून 18 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळतेय.

नाना चौक गवालीया टॅंक इथल्या कमला इमारतीला आग लागली. सकाळी 7.30 च्या सुमारास ही आगीचा भडका उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, आग लेव्हल 3 ची आहे.

दरम्यान या आगीत 2 जणं जखमी झालेत. या जखमींना समोरील भाटिया रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी माहिती घेण्यासाठी किशोरी पेडणेकर दाखल झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *