‘करणी’च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

‘करणी’च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीय. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या भोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पीडित महिलेला तिची सासू काही दिवसांपूर्वी नागनाथ बाबाकडे घेऊन गेली होती. तेव्हा त्या महिलेवर तिच्या आजेसासूने करणी केल्याचं बाबाने सांगितलं.

या समस्येतून बाहेर पडण्यासाठी विवस्त्र होऊन संपूर्ण अंगाला भस्म लावण्याचा उपाय बाबाने सांगितला. हा प्रकार एकदा झाल्यावर त्याने तिला परत रविवारी बोलावलं. त्यावेळी महिलेनं हा प्रकार घरच्यांना सांगितला.

यावेळी महिला बाबाकडे गेल्यावर तो तिला मंडईतल्या एका लॉजवर घेऊन चालला होता. त्याचवेळी महिलेच्या सासूने त्यांचा पाठलाग करून पांडुरंग साळवेला पोलिसांच्या हवाली केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *