मुलानेच जन्मदात्या वडिलांवर केले कोयत्याने सपासप वार; समोर आलं कारण

सामान्य शेतकऱ्याचा तेवीस दिवसांपूर्वी झालेल्या हत्येचा पोलिसांनी उलगडा लावला असून, मुलानेच जन्मदात्या बापाचा कोयत्याने खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आपल्या पत्नीला वडिलांकडून वाईट पद्धतीने बोलले जात असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचही तपासात स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील शेतकरी जगन्नाथ साळूबा मनगटे (६०) हे २८ डिसेंबरला लग्नकार्य आटपून घराकडे निघाले होते. त्यावेळीच त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र एका सामान्य शेतकरी वृद्धाचा खून का झाला? असा प्रश्न पोलिसांसमोर होता. घटनास्थळाचा पंचनामाप्रसंगी अंगठी व हत्या दरम्यान वापरलेला कोयता मिळून आला होता. दरम्यान, फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकाद्वारे पोलिसांना आरोपीपर्यंत जाण्यासाठी ठोस माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी वेषांतर करून परिसरात फिरत माहिती घेतली आणि मुलानेच वडिलांचा खून केल्याचं त्यातून स्पष्ट झाले.

मयत जगन्नाथ मनगटे यांचा मोठा मुलगा आणि दुसरा मुलगा गोरखनाथ यांच्यात पत्नीवरून वाद झालेला होता. यापूर्वीदेखील वडील जगन्नाथ यांनी मुलगा गोरखनाथला पहिल्या पत्नीशी काडीमोड करून दुसऱ्या मुलीशी लावून दिले. पण पूर्वीप्रमाणे वाद सुरूच होता. त्यात वडील आपल्या पत्नीविषयी वाईट बोलत असल्याने गोरखनाथच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे त्याने २८ डिसेंबरला लग्नकार्य आटपून आलेल्या वडिलांना एकटं गाठलं आणि कोयत्याने सपासप वार करत जागीच संपवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *