महिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चोरट्याने चक्क दोन्ही पाय तोडले

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चोरट्याने चक्क महिलेचे दोन्ही पाय तोडले. त्यानंतर तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्याने पोबारा केली. गंभीर जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पीडित महिला ही 50 वर्षांची आहे. तिचा मुलगा धनराज गुर्जर यांनी सांगितले की, अचनाक लुटणाऱ्यांने तिला घेरले आणि लूट केली. पायातील कडे लूटण्यसाठी त्यांने आईचे पाय तोडले. ती मदतीसाठी याचना करीत होती. मात्र, पुढे कोणीही आलेले नाही. लुटणाऱ्यांने डोळ्यात मिरची पावड टाकून पलायन केले.

सवाई माधोपूरचे एसपी दशरथ सिंग यांनी याबाबत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पीडित महिलेच्या जवाब नोंदविण्यात आला असून आरोपची तपास सुरु आहे. लवकरच आरोपीला पडकण्यात येईल, असे सिंग यांनी म्हटलेय. महिलेवर सवाई माधोपूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *