करोनाच्या भीतीनं कुटुंबातील पाच जणांनी घेतलं विष; महिलेसह तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

देशात सध्या पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दैनंदिन दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा करोनाची भीती वाढू लागली आहे. करोनाच्या भीतीने घातपात केल्याच्या घटना गेल्या दोन वर्षात अनेकदा घडल्या. मध्यंतरी एका डॉक्टरनेच करोनाच्या भीतीने पत्नी आणि मुलांचा जीव घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता अशाच एका घटनेत २३ वर्षीय महिलेनं तिच्या तीन वर्षांच्या मुलासह विष घेऊन आत्महत्या केली आहे. तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात ही घटना घडली.

मृत महिलेच्या आई आणि भावांसह कुटुंबातील पाच जणांनी करोनाच्या भीतीने विष प्राशन केले. त्यातील तीन जण वाचले, तर महिला आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा पोलिसांना मृतावस्थेत आढळला.  वृत्तानुसार, मृत महिलेची आई लक्ष्मी पती नागराजच्या मृत्यूमुळे नैराश्यात होती. रोजंदारीवर काम करणाऱ्या तिच्या पतीचा डिसेंबरमध्ये नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला होता. नागराजच्या मृत्यूने कुटुंब दुःखी होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *