२००० हून अधिक प्रवासी करोनाच्या संसर्गामुळे क्रूझव अडकून पडले

करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. २००० हून अधिक प्रवासी करोनाच्या संसर्गामुळे क्रूझव अडकून पडल्याचं समोर आलं आहे. रविवारी रात्रीपासून हे प्रवासी क्रूझवर अडकले आहेत. कूझवरील क्रू मधील काही सदस्या करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांना चाचणीशिवाय उतरण्यास नकार दिला आहे. कॉर्डेलिया हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याला आले आहे.चाचणी केल्यानंतर क्रूझवरील काही प्रवाशी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती गोव्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. क्रूझवरील प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानतंर जहाजातील प्रवाशांना खाली उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. जहाजातील प्रवाशांची एका खासगी हॉस्पिटलद्वारे चाचणी केली जात आहे. प्रवाशांची चाचणी केल्यानंतर आणि त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच सर्व प्रवशांना गोव्यात उतरू दिले जाईल, असे क्रूझवरील संबंधित यंत्रणेला कळवण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.

क्रूझवरील क्रू मेंबरमधील एकच सदस्य अँटिजेन चाचणीत करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. एकाही प्रवाशाला करोनाचा संसर्ग झाला नसल्याचं मुंबई पोर्ट ट्र्स्ट आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जहाज गोव्याच्या दिशेने प्रवास करत आहे. क्रूझवर एकूण २०१७ प्रवासी आहेत.

दरम्यान, क्रूझवरील प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येत आहे. रविवारी रात्री ९.३० पासून ही चाचणी केली जात आहे, अशी माहिती व्हिक्टर हॉस्पिटलचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. यूगने डिसुजा यांनी दिली. रविवारी रात्री. ११.३० पर्यंत ५०० प्रवाशांचे नमुने घेण्यात आले. सर्वांच्या चाचणीचे रिपोर्टहे मध्यरात्री १ वाजेपर्यंत अपेक्षित होते. प्रवाशांची चाचणी सुरू आहे. सर्व प्रवाशांच्या चाचणीसाठी जवळपास ६ ते ८ तास लागतील, असे डिसुजा यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *