तरूणाच्या कानाता तब्बल २६ झुरळ

तरूणाच्या कानाता तब्बल २६ झुरळ

एक १९ वर्षीय तरूण ड़ॉक्टराकडे कान खाजवतो म्हणून गेला, पण धक्कादायकरित्या त्या तरूणाच्या कानाता तब्बल २६ झुरळ सापडले.

ऑस्ट्रेलियात राहणारा  ली हा १९ वर्षीय मुलगा अचानक मध्यरात्री उठला आणि त्याचा कानात चुळचूळ झाली. कान अत्यंत जोरात दुखू लागला. कान दुखत असल्याने त्याने कानात बोट टाकला. काही तरी हलत असल्याचं त्याला जाणवत होते.

खोलीतील मित्रांना काय झालं कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ली एका हॉस्पिटलमध्ये गेला त्यावेळी डॉक्टरांनी एन्डोस्कोपी केली तर त्यावेळी कानात २६ झुरळं सापडली.

झुरळांच्या माद्या त्याच्या कानात सुमारे आठवडाभरापासून राहत होत्या. त्यांनी काही अंडीही टाकली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. ली योग्यवेळेत हॉस्पिटलमध्ये आला नसता तर त्याचा अनेक जखमा झाल्या असत्या.

यामुळे ली याच्या कानात अडथळा निर्माण झाला होता. तसेच सूज आली होती. तसेच उजव्या कानातील त्वचा आणि कानातील नलिका काही खराब झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *