अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात एका २५ वर्षीय भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शाओलिन चंदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा मणिपूरमधील होता. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या शाओलिनने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथीलच एका कंपनीत नोकरी सुरू केली होती.

व्हर्जिनिया राज्यातील हॅम्पटन शहरात त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी किनन पाल्मर नामक हल्लेखोराला अटक केली आहे. एका उद्यानात फिरण्यास गेलेल्या शाओलिनचा किनन सोबत वाद झाला आणि त्यातूनच किननने त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गोळीबाराच्या घटनांप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र तरीही या घटना कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *