अर्ध्यातूनच सोडली पतीची साथ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूर-सांगली मार्गावरील सांगली फाटा टोलनाक्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. रुपाली सुनील नलवडे (वय २४, रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) असं मृत महिलेचं नाव आहे.

मौजे वडगाव गावातून चार दिवसापूर्वी रुपाली नलवडे पती सुनील यांच्यासह मोटारसायकलवरुन कोल्हापूरला जात असताना सांगली फाटा टोल नाक्यावरील खड्ड्यात मोटार सायकल आदळली. त्यामुळे रुपाली या मोटारसायकलवरुन उडून रस्त्यावर पडल्या. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या नातवाईकांनी त्यांना ताबडतोब खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मृत रुपाली नलवडे या गावातीलच कामधेनू सहकारी दूध संस्थेत संगणक ऑपरेटर होत्या.

दरम्यान, सांगली टोल नाका हा बंद असून त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *